Contribution

विनम्र आवाहन

‘मएसो’ ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य शिक्षणसंस्था! इसवीसन १८६० पासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सचोटीने कार्यरत असलेली, विद्यार्थ्यांना कालसुसंगत विद्या प्रदान करण्याचा वसा अखंडपणे जोपासत असलेली ही संस्था म्हणजे जणू एक भव्य परिवारच आहे. शिक्षणाच्या या प्रांगणात आपणही लहानाचे मोठे झालात, स्वतःच्या पायावर उभे राहिलात, समर्थ झालात. जीवनव्यवहाराच्या या प्रवाहात आपल्याप्रमाणेच अनेकांना समर्थ बनविण्याचे संस्थेचे ब्रीद आजही कायम आहे.

पिढ्या न् पिढ्या घडवत समृद्ध होत गेलेली ही संस्था आजही अनेक विद्यार्थ्यांना विकसित करते आहे, दरवर्षी सुमारे ५०,००० हून अधिक विद्यार्थ्यांचे विकसन पाहते आहे. या सर्व विद्यार्थ्यांना विद्या प्रदान करण्यासाठी बदलत्या काळानुसार अद्ययावत अशा तंत्रज्ञानाचा आधार घेते आहे.

शिक्षणप्रक्रिया अधिक आनंददायी व परिणामकारक होण्यासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण असे प्रकल्प, उपक्रम आखते आहे. विद्यार्थ्यांपुढे विकासाचे अनेक मार्ग खुले व्हावेत यासाठी नवनवीन विद्याशाखांमध्ये विस्तार करते आहे, त्यासाठी आणखी वास्तूंचे बांधकाम, उत्तमोत्तम अशा सोयी-सुविधा, यंत्रणा राबविण्याचे प्रकल्प संस्थेच्या विचाराधीन आहेत.

आमच्या या प्रयत्नांना आपल्या भरभक्कम पाठिंब्याची गरज आहे. आपण आपल्या मातृसंस्थेशी खालील माध्यमांतून जोडले जाऊ शकता

  • यथाशक्य अर्थसाहाय्य
  • आपण कार्यरत असलेल्या क्षेत्राबाबत मार्गदर्शन
  • संस्थेच्या विविध उपक्रमांत आपला बहुमूल्य वेळ देऊन सहभाग
  • माजी विद्यार्थी संघ अधिक बळकट करण्यासाठी सहभाग
  • शिक्षणास पूरक ठरतील अशा विविध संस्थांशी नेटवर्किंगसाठी दुवा म्हणून सहभाग

आपला सहभाग, स्नेहभावाने दिलेला सहयोग संस्थेस अमुल्य ठरेल. त्याचबरोबर संस्था १६० वर्षे पूर्ण करताना या उभारणीत माझाही हातभार लाभला ही जाणीव तुम्हालाही किती सुखावणारी असेल! शतकोत्तर हीरक महोत्सवाच्या या टप्प्यावर आपण संस्थेशी जोडले जावे, आपले ऋणानुबंध असेच कायम टिकून राहावेत हीच सदिच्छा.

लवकरच भेटू!
कळावे.

 

Donation in Indian Rupee

Click Here To Donate